Saturday, 07 November 2026 ई-पेपरसंपर्क
विश्वसनीय बातमी • तत्काळ अपडेट
● BREAKING NEWS
दैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरीदैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरी

भाजपच्या सत्तेत संघाच्या RSS स्वयंसेवकांचा श्वास गुदमरतोय काय?

प्रकाशित: 16 October 2026 अपडेट: 16 October 2026 128 views
१६ ऑक्टोबर २०२६ नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS राजधानीत प्रा. अनिल सोले यांच्या बंडखोरीने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर सोले यांनी माघार घेतली. गिरीश व्यास यांची नाराजीही निवळली. पण हा केवळ उमेदवारीचा वाद होता की भाजपच्या निर्णयप्रक्रियेतील वाढत्या केंद्रीकरणाविरुद्धचा असंतोष? हा अभ्यासाचा विषय ठरत आहे.

RSS संघाचा त्याग, जनसंघाची निष्ठा आणि राष्ट्रनिर्माणाच्या संस्कारांपेक्षा सत्तेचे राजकारण मोठे झाले आहे काय?अनिल सोले यांची माघार झाली; पण भाजपच्या कार्यपद्धतीवरील गंभीर प्रश्न कायम!

१६ ऑक्टोबर २०२६
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS राजधानीत प्रा. अनिल सोले यांच्या बंडखोरीने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर सोले यांनी माघार घेतली. गिरीश व्यास यांची नाराजीही निवळली. पण हा केवळ उमेदवारीचा वाद होता की भाजपच्या निर्णयप्रक्रियेतील वाढत्या केंद्रीकरणाविरुद्धचा असंतोष? हा अभ्यासाचा विषय ठरत आहे.

एका नेत्याची नाराजी दूर झाली; पण निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा आणि पक्षांतर्गत लोकशाहीचा प्रश्न सुटला काय?

ज्या भाजपची पायाभरणी संघाच्या RSS हजारो स्वयंसेवकांनी, पूर्णवेळ प्रचारकांनी आणि जनसंघाच्या निष्ठावंतांनी आयुष्याचा त्याग करून केली, त्या पक्षात आज त्यांच्याच अनुभवाला आणि मताला किती स्थान उरले आहे? कालपर्यंत काँग्रेसमध्ये असलेले नेते भाजपमध्ये येऊन सत्तेच्या महत्त्वाच्या पदांवर पोहोचतात; पण अनेक दशकांपासून संघटनासाठी झिजलेल्या कार्यकर्त्यांना निर्णयप्रक्रियेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळते काय?संघटन उभारणारे मागे आणि सत्तेची संधी साधणारे पुढे, अशी परिस्थिती निर्माण होत आहे काय?माझे वडील स्व. पंडित जमुनाशंकर ऊर्फ भय्याजी तिवारी व त्यांच्या सोबत हजारो कार्यकर्त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून वा साधे सैनिक म्हणून पश्चिम विदर्भात जनसंघाची पाळेमुळे रुजवली. आणीबाणीत तुरुंगवास भोगला. त्यांच्या पिढीने पद, पैसा आणि सत्तेसाठी नव्हे, तर विचार, चारित्र्य, शिस्त आणि राष्ट्रनिर्माणासाठी आयुष्य समर्पित केले.

आज त्या पिढीच्या त्यागाची आठवण झाली की एक प्रश्न अस्वस्थ करतो.संघाने राष्ट्रनिर्माणासाठी स्वयंसेवक घडवले; पण भाजपच्या
सत्ताकारणात त्यांची भूमिका केवळ निवडणुकीपुरती मर्यादित होत आहे काय? RSS एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि आता अनिल सोले यांच्याशी संबंधित राजकीय घटनांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. तरीही पक्षातील मतभिन्नता, ज्येष्ठांचा सन्मान आणि सामूहिक निर्णयप्रक्रिया यांविषयी प्रश्न निर्माण होतात. नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या संघटनात्मक अनुभवाला आणि जुन्या जनसंघ परंपरेतील कार्यकर्त्यांच्या मताला आज किती महत्त्व दिले जाते?पक्षशिस्त म्हणजे विचारांशी निष्ठा की नेतृत्वाच्या प्रत्येक निर्णयाला प्रश्न न विचारता मान्यता देणारे हुजऱ्यांची टोळीतले भाट अरे परखड मत संघातून तयार झालेले एक शिस्तप्रिय नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे

SUPER BHARAT

SUPER BHARAT
लेखक / प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *