# बालविवाह कायद्यांतर्गत ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

- Link: https://superbharat.in/cases-registered-against-7-people-under-child-marriage-act/
- Published: 2026-07-12T05:14:34+00:00
- Author: SUPER BHARAT

**\*वरूड/तुषार अकर्ते\***

**शे.घाट पोलिस स्टेशन हद्दीत १७ वर्षीय युवतीचा तिच्या कुटुंबीयांनी तिचे इच्छेविरुद्ध

बाल विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तक्रारीनंतर उघड झाला. याप्रकरणी पोलिसांकडून
बालविवाह कायद्यांतर्गत ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिडिता अल्पवयीन असल्याचे माहीती असुन सुद्धा तिच्या कुटुंबातील
काही लोकांनी तिला न सांगता रूपेश कवडेती या युवकासोबत तिचा विवाह जोडला. माझे वय १८
वर्ष पुर्ण झाले नसताना मला जबरदस्तीने रूपेशसोबत विवाह करायला लावत असल्याची माहिती
तिने तिच्या वडिलांना फोनवरून दिली. परंतु, तिच्या वडीलांनी तिला सहकार्य न करता तु
हा विवाह केला नाहीस तर मी विष प्राशन करून मरून जाईल अशी धमकी तिला दिली.

त्यामुळे तीने याधमकीला घाबरून या विवाहाला होकार दिला. या विवाहाला तिचे काका सुरेश
कुमरे सुद्धा हजर होते. ती अल्पवयीन असल्याची माहीत असुन सुद्धा संबंधित आरोपीतांनी
जबरदस्तीने तिचा विवाह २२ ते २४ जुन दरम्यान लावुन दिला. याप्रकरणी पिडीतेने ९ जुलै
रोजी शे.घाट पोलिसांत तक्रार दिली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी एकूण ७ लोकांविरुद्ध 
बाल विवाह कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले.

यामध्ये देवराव कुमरे, नितेश नवडेक रा.वघार वंडली, रूपेश बलदेव कवडेती, योगिता पाटील,
कमलेश पाटील रा.अंबाडा, सविता धुर्वे, पंचफुला कवडेती रा.रवाळा यांचा समावेश आहे. सदर
घटनास्थळ मोर्शी पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने शे.घाट पोलिसांकडून ते वर्ग करण्यात 
आल्याने पुढील तपास मोर्शी पोलिस करत आहे.
