# Dussehra : दसऱ्याला शस्त्रपूजनाचा 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त ! जाणून घ्या मुहूर्ताची वेळ व संपूर्ण पूजेचा विधी !

- Link: https://superbharat.in/dussehra-a-45-minute-auspicious-window-for-shastra-puja-worship-of-weapons-tools-find-out-the-timing-and-the-complete-ritual-procedure/
- Published: 2026-10-19T10:40:24+00:00
- Author: SUPER BHARAT

**आशिष बडवे / 19 ऑक्टोंबर **

**पांढरकवडा – नऊ दिवसांची नवरात्री संपल्यानंतर लगेच दहाव्या दिवशी Dussehra** **विजयादशमीचा
सण साजरा केला जातो. दसऱ्याच्या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. हा 
दिवस अधर्मावर धर्माचा विजय म्हणून ओळखला जातो. या दिवशी शस्त्रपूजन करण्याची प्रथा
आहे. घरातील देवपूजा केल्यानंतर दाराला छान फुलांचे तोरण बांधून घरातील गाड्यांची पूजा
व कामाच्या वस्तूंचे तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे यादिवशी विशेष पूजन केले
जाते. पाहुयात दसऱ्याच्या या पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे?**

![](http://superbharat.in/wp-content/uploads/2026/08/download-1.jpg)

Dussehra विजयादशमीचा सण हा असत्यावर सत्याचा विजय व अधर्मावर धर्माचा विजय म्हणून 
साजरा केला जातो. हा सण हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचा मानला जातो. यादिवशी घराची सासफाई
करून छान दारात सडा रांगोळी टाकली जाते. झेंडूच्या फुलांचे तोरण दाराला बांधले जाते.
आंब्याची पाने देखील दाराला बांधली जातात. घरातील वाहनांची यादिवशी हार घालून पूजा 
केली जाते. तसेच देवघरातील पूजा करून शस्त्रपूजन करण्याची प्रथा यादिवशी आहे. हे शस्त्रपूजन
म्हणजेच आपल्या कामाच्या वस्तूंचे पूजन केले जाते. तर विद्यार्थी यादिवशी वह्या पुस्तके
पाटी,पेन्सिल व आपल्या शाळेच्या दप्तराचे देखील पूजन करतात. पाटीवर सरस्वती काढून तिला
फुल वाहून पूजा केली जाते. अशाप्रकारे हा सण उत्साहात साजरा होतो. मात्र या पूजेसाठी
शुभ मुहूर्त असतो. शस्त्रपूजन हे मुहूर्तावर करण्याची मान्यता आहे. चला पाहुयात यंदा
शास्त्रपूजनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे.

## Dussehra दसरा 2026 पूजेचा शुभ मुहूर्त

**शस्त्रपूजन विजय मुहूर्त : 20 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1 वाजून 59 मिनिटांपासून 
ते 2 वाजून 45 मिनिटांपर्यंत**

**दसरा पूजेचा मुहूर्त : दुपारी 1 वाजून 14 मिनिटांपासून ते 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत**

**शस्त्रपूजनाचा शुभ मुहूर्त हा एकंदरीत 45 मिनिटांचा असणार आहे.**

दिवाकर पंचांगानुसार दसरा आणि दुर्गा विसर्जन 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.51 वाजेपर्यंत
असेल. 20 ऑक्टोबर रोजी दशमी तिथी दुपारी 2.12 वाजेपर्यंत असेल अशा परिस्थितीत 20 ऑक्टोबरला
विजयादशमी साजरी करणे शास्त्रोक्त ठरेल, असे अनेक ज्योतिषी सांगतात. Dussehra

## Dussehra **रावण दहन 2026 शुभ मुहूर्त**

![](https://superbharat.in/wp-content/uploads/2026/10/dussehraaaa.webp)

दसऱ्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात रावण दहन केला जातो. अशा परिस्थितीत यंदा
ज्योतिषी सांगतात की, जर तुमच्या भागात 20 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जात असेल तर या
दिवशी रावण दहन प्रदोषकाळात संध्याकाळी 6.41 ते 7.7 पर्यंत करण्याचा मुहूर्त आहे. हा
26 मिनिटांचा कालावधी रावण दहनसाठी सर्वोत्तम असेल.Dussehra
