# गोदावरी (Godavari) अर्बन केवळ संस्था नसून एक दृढ विश्‍वास! – ज्येष्ठ कामगार नेते शंकर अण्णा धोंडगे यांचे प्रतिपादन

- Link: https://superbharat.in/godavari-urban-is-not-merely-an-institution-but-a-firm-conviction-assertion-by-veteran-labor-leader-shankar-anna-dhondge/
- Published: 2026-09-29T15:25:34+00:00
- Author: SUPER BHARAT

## 5,561 कोटींच्या ठेवींसह 7टक्के लाभांश जाहीर; 13 वी सर्वसाधारण सभा उत्साहात

**जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ, दि.29 प्रतिनिधीदेशाच्या सहकार विश्‍वात आपल्या पारदर्शक
कारभाराने आणि आर्थिक शिस्तीने वेगळा ठसा उमटविलेल्या ’गोदावरी (Godavari) अर्बन’या
प्रतिष्ठित पतसंस्थेची 13वी वार्षिक सर्वसाधारण सभा नांदेड येथील ब्लेसिंग सभागृहात
उत्साहात पार पडली. संस्थेने यंदा तब्बल 5,561 कोटी रुपयांचा एकूण व्यवसायाचा टप्पा
पार केला आहे. संस्थेला 29.32 कोटी इतका शुद्ध नफा झाला, या यशाचे फलित म्हणून सभासद
व ग्राहकांसाठी 7 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जीवन पाटील, संस्थेच्या
अध्यक्षा राजश्री पाटील, उपाध्यक्षा हेमलता देसले, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर,
सचिव अ‍ॅड. रवींद्र रगटे, प्रा. सुरेश कटकमवार, वर्षा देशमुख, साहेबराव मामीलवाड, यशवंत
सावंत, वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अजय देशमुख सरसमकर, वैधानिक लेखापरीक्षक
जीवन लाभशेटवार, ज्येष्ठ पत्रकार विश्‍वनाथ देशमुख, पंढरीनाथ बोकारे, नेसन्सच्या प्रमुख
सुमलता राव, वैधानिक लेखापरीक्षक अली असगर, उपसरव्यवस्थापक सुरेखा दवे, सहाय्यक सरव्यवस्थापक
रवी इंगळे, विजय शिरमेवार आदी उपस्थित होते.(Godavari)

सभेत अध्यक्षा सौ. राजश्री पाटील यांनी सांगितले की, ’संस्थेने आर्थिक शिस्त पाळत ग्राहकाभिमुख
सेवांना प्राधान्य दिल्याने विश्‍वासाचा पाया अधिक मजबूत झाला. संस्थापक आमदार हेमंत
पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळेच ही घोडदौड शक्य झाली असून, सहकार क्षेत्रात
उंचावर यशाची गुढी उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.‘ यावेळी माजी आमदार शंकरअण्णा 
धोंडगे म्हणाले की, ’गोदावरी अर्बनचा पारदर्शक कारभार आणि संस्थेने दाखविलेली तत्परता
आणि आर्थिक सुदृढता महाराष्ट्रातील इतर पतसंस्थांसाठी मार्गदर्शक ठरेल.,‘ आमदार आनंदराव
बोंढारकर यांनी गोदावरी अर्बनच्या उभारणीमध्ये संस्थापक अध्यक्ष आमदार हेमंत पाटील 
आणि अध्यक्षा राजश्री पाटील यांचे योगदान मोलाचे असल्याचे मत व्यक्त केले. आमदार बालाजी
कल्याणकर यांनी गोदावरी अर्बनचा प्रवास नदीच्या प्रवाहाप्रमाणे सातत्याने विस्तारत 
असून, या यशामागे सहकारातील अनुभवसंपन्न व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांचे नियोजन
असल्याचे सांगितले.(Godavari)

व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून मागील आर्थिक 
वर्षातील संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला. मागील आर्थिक वर्षात संस्थेच्या एकूण ठेवी
3 हजार 79 कोटी रुपये, कर्ज वितरण 2 हजार 481 कोटी रुपये तर एकूण व्यवसाय 5 हजार 561
कोटी रुपये इतका झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

सभेच्या निमित्ताने संस्थेतील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अधिकारी, कर्मचारी आणि शाखांचा
विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. ‘इन युअर ऑनर’ पुरस्काराने जीवन लाभशेटवार, सुमलता
राव, संदीप ओमप्रकाश कोयटे, सहायक सरव्यवस्थापक रवी इंगळे व अली असगर हुसेन यांना सन्मानित
करण्यात आले. सर्वोच्च ठेवी उत्कृष्टपूर्ती शाखा पुरस्कार- यवतमाळ शाखा एक-447 कोटी
ठेवी, पुसद शाखा- 203 कोटी, यवतमाळ शाखा दोन-187 कोटी, मुख्य शाखा 152 कोटी, वणी शाखा
106 कोटी, नागपूर शाखा 98 कोटी ठेवी यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट वसुली शाखा
म्हणून यवतमाळ शाखा एकचे विशेष पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले.

सर्वोत्तम सहाय्यक कर्मचारी म्हणून भूषण काळमेघ, कनिष्ठ अधिकारी आकाश भिसे, सहाय्यक
अधिकारी म्हणून दिलशाद बेग फरहत मिर्झा, अधिकारी नीलेश होनाडे, सहाय्यक व्यवस्थापक 
प्रवीण देशमुख, उपव्यवस्थापक सुमीत देवरे, शाखाधिकारी अविनाश बोचरे आणि वरिष्ठ व्यवस्थापक
दीपक अवसरमोल यांचा गौरव करण्यात आला. सर्वाधिक ठेवी असलेल्या शाखांमध्ये यवतमाळ शाखा
एक, सिरिसिला, कडपा, सुरत आणि होस्पेट शाखांचा सन्मान करण्यात आला.

‘सुधन गोल्ड लोन’पुरस्कार वर्धा, प्रोद्दुत्तूर, वेमुलवाडा व बसवकल्याण शाखांना, तर
सर्वोत्कृष्ट विस्तारित शाखेचा पुरस्कार कुरूंदा विस्तारित शाखेला प्रदान करण्यात आला.
यावेळी सहाय्यक सरव्यवस्थापक रवी इंगळे यांच्या कार्याचा प्रवास आणि यशोगाथा मुलाखतीच्या
माध्यमातून मांडण्यात आली. अमरावतीचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक गिरीश अष्टोणकर यांनी 
ही मुलाखत घेतली. सभेचे सूत्रसंचालन प्रा. नितीन हाटकर यांनी तर आभार संचालक प्रा. 
सुरेश कटकमवार यांनी मानले. या सभेला संस्थेचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी,
सभासद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

![](https://superbharat.in/wp-content/uploads/2026/09/rajashree-patil.jpg)

> ’‘गोदावरी अर्बन ही केवळ एक पतसंस्था नसून तो एक समृद्ध परिवार आहे, एक पुरोगामी 
> विचार आहे आणि लाखो सभासदांचा दृढ विश्‍वास आहे! या यशामागे सभासदांचा गाढा विश्‍वास,
> ग्राहकांचे प्रेम आणि अधिकारी-कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस केलेली पराकाष्ठा हीच आमची
> खरी ताकद आहे.”
> **-सौ. राजश्री पाटील, अध्यक्ष, गोदावरी (Godavari) अर्बन.**

![](https://superbharat.in/wp-content/uploads/2026/09/dhananjay-tambekar.jpg)

> ”यंदा सभासद व ग्राहकांसाठी 7टक्के लाभांश जाहीर करताना विशेष आनंद झाला. मागील आर्थिक
> वर्षात संस्थेने 5,561 कोटींचा एकूण व्यवसाय पूर्ण केला असून, ही कामगिरी संपूर्ण
> गोदावरी अर्बन परिवाराच्या एकजुटीचे प्रतीक आहे.”
> -धनंजय तांबेकर,**व्यवस्थापकीय 
> संचालक, गोदावरी अर्बन.**
