# यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत घोडा बाजार Horse-trading सुरु पण पत्रकारांच्या बाबतीत मात्र हात आकडता ?

- Link: https://superbharat.in/horse-trading-is-underway-in-the-yavatmal-district-central-bank-election-yet-the-purse-strings-are-tight-when-it-comes-to-journalists/
- Published: 2026-10-05T17:05:59+00:00
- Author: SUPER BHARAT

**उमरखेड – Horse-trading** **यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सध्या लागलेली
आहे आणि या निवडणुकीमध्ये दिग्गज उमेदवार उभे आहेत ! मतदान कमी असल्यामुळे मतदाराला
लुभविण्यासाठी अनेक हातखंडे वापरले जात आहेत त्याचबरोबर मोठा घोडा बाजार सुरू असल्याची
ही जबरदस्त व खात्रीदायक चर्चा सुरु आहे .**

उमरखेड मधून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकारांना पाठिंबा देण्यासाठी व उमेदवारी मागे
घेत असल्याचे सांगण्यासाठी डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी पत्रकार परिषद यवतमाळ जिल्हा
समन्वय नितीन भुतडा यांच्या निवासस्थानी घेतली .जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या
आग्रहाखातर खास करून जवळपास सर्वच पत्रकार या पत्रकार परिषदेला हजर होते .वाटले सर्वांना
पत्रकार परिषदेनंतर खुश केले जाईल पण अद्याप तरी कोणाला खुश केल्याचे ऐकण्यात आले नाही.
नियमाप्रमाणे जाहिराती ही मिळाल्या नाहीत .पण आयोजकाची बातम्या प्रसारित कराव्यात यासाठी
मात्र तीव्र इच्छा होती तशीच इच्छा पत्रकारांची सुद्धा असेल याचे भान त्यांना नाही .
Horse-trading

> त्याचबरोबर दुसरे उमेदवार राम देवसरकार हे तर फोनच उचलत नाहीत किंवा अति व्यस्त असल्याचे
> दाखवतात .त्यामुळे अशा उमेदवारांपासून बँकेचा विकास होईल ही कल्पना मात्र फुसकी वाटते!
> मला पहा आणि फुले वाहा अशा पत्रकार परिषदा कामाच्या नाहीत आणि ज्यांना पत्रकारांच्या
> अधिकृत पावत्या फाडता येत नाहीत किंवा त्यांचा सन्मान करता येत नाही त्यांनी अशा 
> पत्रकार परिषदा घेऊ नयेत (तुर्त इतकेच )💐💐💐डॉक्टर आंबेजोगाईकर अग्निबाण लाईव्ह
> न्युज चॅनल उमरखेड Horse-trading
