Saturday, 07 November 2026 ई-पेपरसंपर्क
विश्वसनीय बातमी • तत्काळ अपडेट
● BREAKING NEWS
दैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरीदैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरी

प्राजक्ता माळीचा वाढदिवस शेतातच साजरा; निसर्गप्रेमी प्राजक्ताचं कर्जतमधील निसर्गाच्या कुशीतलं फार्महाऊस आहे तरी कसं?

प्रकाशित: 11 August 2026 अपडेट: 11 August 2026 54 views
अभिनेत्री प्राजक्ता माळीने वाढदिवशी शेतात काम करत साधेपणाने दिवस साजरा केला.कर्जतमधील तिचं ‘प्राजक्त कुंज’ फार्महाऊस निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं असून साधेपणा आणि सौंदर्याचा सुंदर मेळ घालणारं आहे.याच फार्महाऊसच्या सजावटीतून घरासाठीही अनेक होम डोकॉर आयडिया घेता येतात.

मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळीने वाढदिवशी शेतात काम करत साधेपणाने दिवस साजरा केला.कर्जतमधील तिचं ‘प्राजक्त कुंज’ फार्महाऊस निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं असून साधेपणा आणि सौंदर्याचा सुंदर मेळ घालणारं आहे.याच फार्महाऊसच्या सजावटीतून घरासाठीही अनेक होम डोकॉर आयडिया घेता येतात.

अभिनय, निवेदन आणि आपल्या खास अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वासोबतच निसर्गप्रेमासाठीही ओळखली जाते. वाढदिवसाच्या दिवशी शेतात काम करत तिने साधेपणाने हा खास दिवस साजरा केला. मातीशी नातं जोडणारा तिचा हा अंदाज सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, प्राजक्ताचं कर्जतमधील ‘प्राजक्त कुंज’ हे फार्महाऊसही तिच्या निसर्गावरील प्रेमाची झलक दाखवतं. शहराच्या धावपळीपासून दूर, हिरवाईने नटलेल्या वातावरणात असलेलं हे फार्महाऊस प्राजक्तासाठी खास आहे. या ठिकाणाची रचना, आजूबाजूचा निसर्ग आणि घरातील सजावटीतून साधेपणा आणि निसर्गाचा सुंदर मेळ पाहायला मिळतो. प्राजक्त कुंजची हीच खासियत घराच्या सजावटीसाठीही अनेक होम डेकॉर देऊन जाते.

कर्जत म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर, मोकळी हवा आणि पावसाळ्यात आणखी खुलून दिसणारा निसर्ग. अशाच वातावरणात प्राजक्ता माळीने आपलं फार्महाऊस उभारलं आहे.‘प्राजक्त कुंज’ हे तिच्यासाठी केवळ एक विकेंड होम नाही, तर रोजच्या धावपळीपासून काही काळ स्वतःला दूर ठेवण्यासाठीचं हक्काचं ठिकाण असल्याचं तिच्या पोस्टमधून जाणवतं. शहरात कितीही व्यस्त वेळापत्रक असलं तरी निसर्गाच्या कुशीत काही क्षण निवांत घालवता यावेत, हीच या फार्महाऊसमागची कल्पना असल्याचं दिसतं. फार्महाऊसच्या आजूबाजूला असलेली हिरवाई या जागेच्या सौंदर्यात आणखी भर घालते. त्यामुळे घरात बसूनही बाहेरचा निसर्ग अनुभवता येतो.

लाकडी फर्निचरचा वापर

निसर्गाच्या जवळ जाणारी घराची सजावट करायची असेल, तर लाकडी फर्निचर हा नेहमीच सुंदर पर्याय ठरतो. लाकडाचा नैसर्गिक पोत घराला उबदार आणि प्रसन्न वातावरण देतो. लिव्हिंग रूममध्ये लाकडी सेंटर टेबल, आरामदायी खुर्च्या, डायनिंग टेबल किंवा बेडरूममध्ये लाकडी बेड आणि कपाटाचा वापर केल्यास घराला साधा, एलिगंट आणि नैसर्गिक लूक मिळतो. त्यासोबत हलक्या रंगांचे कुशन, मातीच्या वस्तू आणि हिरवीगार रोपं ठेवल्यास संपूर्ण सजावटीला अधिक आकर्षक आणि निसर्गाशी जोडलेला टच देता येतो.

पडद्यांचा सिंपल लुक

घराच्या सजावटीत पडद्यांची निवडही तितकीच महत्त्वाची असते. निसर्गरम्य आणि शांत वातावरणाचा अनुभव कायम ठेवायचा असेल, तर पांढरे, क्रीम, बेज किंवा हलक्या रंगांचे साधे पडदे निवडता येतील. खूप जड डिझाइन किंवा भडक प्रिंट्सऐवजी हलक्या कापडाचे पडदे वापरल्यास घरात नैसर्गिक प्रकाश सहज येतो आणि जागा अधिक मोकळी व प्रसन्न दिसते. विशेषतः मोठ्या खिडक्यांसाठी फ्लोअर-लेंथ पडदे वापरल्यास घराला साधा, एलिगंट आणि मॉडर्न लूक मिळतो.

साधं सिंपल किचन

घराच्या सजावटीत किचनही साधं, स्वच्छ आणि मोकळं ठेवता येतं. पांढरा, क्रीम किंवा लाकडी रंगाच्या कॅबिनेट्स वापरल्यास किचनला नैसर्गिक आणि आकर्षक लूक मिळतो. गरजेपुरतंच फर्निचर ठेवून काउंटरवर कमी वस्तू ठेवल्यास किचन अधिक नीटनेटके दिसते. लाकडी शेल्फ, छोट्या रोपांची सजावट आणि साध्या डिझाइनच्या वस्तूंचा वापर करून किचनला मॉडर्नसोबतच उबदार आणि घरगुती लूक देता येतो.

घराभोवती हिरवळ

घराच्या आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि रोपं असतील, तर संपूर्ण परिसर अधिक प्रसन्न आणि सुंदर दिसतो. छोटंसं गार्डन, कुंड्यांमधील फुलझाडं किंवा अंगणात सावली देणारी झाडं लावून घराला निसर्गरम्य लूक देता येतो. हिरवाईमुळे घराचं सौंदर्य तर वाढतंच, शिवाय सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा निवांत वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्याचा आनंदही मिळतो.

योग्य रंगाचा वापर

घराच्या सजावटीत रंगांची निवड खूप महत्त्वाची असते. निसर्गाच्या जवळ जाणारा आणि शांत वातावरणाचा अनुभव देणारा लूक हवा असेल, तर बेज, क्रीम, पांढरा, ऑलिव्ह ग्रीन, ब्राऊन आणि मातीच्या रंगछटा वापरता येतात. भिंतींसाठी हलके रंग निवडल्यास घर अधिक प्रशस्त आणि मोकळं दिसतं, तर लाकडी फर्निचर आणि हिरव्या रोपांमुळे या रंगांना सुंदर कॉन्ट्रास्ट मिळतो. फार्महाऊससारख्या घरात अतिशय गडद किंवा भडक रंगांचा अतिरेक टाळून नैसर्गिक रंगछटांचा वापर केल्यास साधेपणातही घराला आकर्षक आणि आलिशान लूक देता येतो.

SUPER BHARAT

SUPER BHARAT
लेखक / प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *