Friday, 06 November 2026 ई-पेपरसंपर्क
विश्वसनीय बातमी • तत्काळ अपडेट
● BREAKING NEWS
दैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरीदैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरी

Agri-tourism कृषी पर्यटन केंद्र : मातीशी नाळ जोडणारा उपक्रम -उपसंचालक (पर्यटन) विजय जाधव

प्रकाशित: 30 September 2026 अपडेट: 30 September 2026 85 views
Agri-tourism हैदराबाद/अकोला ( एजन्सी), ग्रामीण भागातील माती, माणसं, संस्कृती, परंपरा, निसर्ग व खाद्यसंस्कृती आदी संदर्भात भावी पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. कृषी पर्यटन केंद्रातून विविध घटकांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनदर्शन घडविण्यात येत असल्यामुळे ही केंद्र मातीशी नाळ जोडणारा उपक्रम ठरेल, असे प्रतिपादन अमरावती पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव यांनी आज येथे केले.
Ashish Badwe (Reporter)

कृषी पर्यटन कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Agri-tourism हैदराबाद/अकोला ( एजन्सी), ग्रामीण भागातील माती, माणसं, संस्कृती, परंपरा, निसर्ग व खाद्यसंस्कृती आदी संदर्भात भावी पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. कृषी पर्यटन केंद्रातून विविध घटकांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनदर्शन घडविण्यात येत असल्यामुळे ही केंद्र मातीशी नाळ जोडणारा उपक्रम ठरेल, असे प्रतिपादन अमरावती पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव यांनी आज येथे केले.

जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्य प्रसंगी शेतकरी बाधवांना कृषी पर्यटन धोरणांतर्गत पुरक व्यवसायाकरीता प्रोत्साहन देण्यासाठी कन्हेरी सरप येथील वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्र येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालिका मोसमी कोसे, शाश्वत विकास केद्र, अमरावतीचे गणेश चौधरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ प्रा. डॉ. नितीन कोंडे, कृषी विद्यापीठाचे मृद व जलासंधारण विभागाचे प्रा. राजू इस्वाळ, सहा. पर्यटन अधिकारी किरण गाडेकर, शिवाजी गायकवाड, उपलेखापाल राजेश मोहिते, कमलेश नंदनवार, श्रीमती उज्जवला काळे यांच्यासह अमरावती विभागातील प्रगत शेतकरी व कृषी पर्यटन केंद्राचे संचालक यावेळी उपस्थित होते. Agri-tourism

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि किर्ती बिरारे व चमूव्दारे श्री गणेश वंदनाच्या सादरीकरणाने झाली. श्री. जाधव म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करुन देणे तसेच शहरी पर्यटकांना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळावा या उद्देशाने राज्यात कृषी पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना पर्यटन संचालनालयाव्दारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध दिल्या जाते. पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना होम स्टे, रेस्टॉरेन्ट, रिसॉर्ट, टूर गाईड, ट्रव्हल एजंट, साहसी पर्यटन, इ व्हेईकल, उपहारगृह, कृषी पर्यटन केंद्र आदी पात्र व्यवसायांकरिता ‘आई’ योजनेंतर्गत व्याज परतावा योजना राबविण्यात येते . Agri-tourism

शहरातील लहान मुला-मुलींना व पर्यटकांना ग्रामीण संस्कृती, परंपरा, शेती विषयी व शेती पिक प्रक्रिया व खाद्य संस्कृती आदी संदर्भात प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती होण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी पर्यटन विभागाव्दारे योजनेतून लाभ दिला जातो. या योजनेतून स्थानिकांना रोजगार व स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध होते. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आर्थिक सुबत्ता प्राप्त करावी, असेही श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले. Agri-tourism

गावांचे शहरीकरण झाल्याने ग्रामीण संस्कृतीतील पारंपारिक पीक पध्दती, खाद्यसंस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. माती ही सुध्दा मणुष्याप्रमाणे सजीव आहे, हे मातीचे गुणधर्म मुलांनी प्रत्यक्ष अनुभवले तरच त्यांना त्याबाबतचे बारकावे व शास्त्रीय कारणे कळेल. कृषी पर्यटन केंद्रातून निसर्गाचे विज्ञान, कृषी विज्ञान, प्रत्येक सजीव प्राण्यांचे जीवनचक्र याविषयी भावी पीढीला ज्ञान मिळेल, आणि या माध्यमातून एक सुजान पिढी निर्माण होईल. असे प्रा. डॉ. नितीन कोंडे यांनी यावेळी सांगितले. Agri-tourism


कृषी पर्यटन केंद्रात लोककला, हस्तकला, गीत-पारंपारिक वाद्य, खाद्यपदार्थ आदी लोप पावत असलेल्या घटकांना दर्शनीरुपात मांडणी केल्याने ग्रामीण संस्कृतीचे जतन करता येईल, व नवीन पिढीला याविषयी माहिती होईल. या केंद्रांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनास मदत कृषी पर्यटन हा ग्रामीण विकासाचा पाया होऊ शकतो. पर्यावरणाच्या संवर्धना बाबत जनजागृतीचे महत्वपूर्ण कार्य या माध्यमातून पार पाडले जावू शकते, असे पीकेव्हीचे प्रा. राजू इस्वाळ यांनी यावेळी सांगितले. अमरावती शाश्वत विकास केंद्राचे गणेश चौधरी यांनी कृषी पर्यटन केंद्रातील विविध सुविधांबाबत माहिती यावेळी उपस्थित शेतकरी बंधूना दिली. Agri-tourism

केंद्रात माध्यमातून सुरक्षित समायोचित भाषणे केले. यावेळी अमरावती विभागातील उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्रांचा व पर्यटन मित्रांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात मोहन तेजराव जगताप, मामाच वावर कृषी पर्यटन केंद्र, वळती, जिल्हा बुलढाणा, विजय श्रीराव, महेंद्री कृषी पर्यटन केंद्र, वरूड, जिल्हा अमरावती, नागेश कन्नामे, रोअर कृषी पर्यटन केंद्र, जिल्हा यवतमाळ, प्रकाश पोहरे, वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्र, कण्हेरी सरप, जिल्हा अकोला, राहुल देशमुख, नेचर ब्लीस कृषी पर्यटन केंद्र, जिल्हा वाशीम व पर्यटन मित्र संदेश भारद्वाज, रोअर कृषी पर्यटन केंद्र, सुन्ना,जिल्हा यवतमाळ, आशिष ताेमर, जंगल बुक अडव्हेनचर, चिखलधरा,अमरावती आदी चा समावेश आहे. Agri-tourism

SUPER BHARAT

SUPER BHARAT
लेखक / प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *