Saturday, 07 November 2026 ई-पेपरसंपर्क
विश्वसनीय बातमी • तत्काळ अपडेट
● BREAKING NEWS
दैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरीदैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरी

बालविवाह कायद्यांतर्गत ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

प्रकाशित: 12 July 2026 अपडेट: 12 July 2026 21 views
शे.घाट पोलिस स्टेशन हद्दीत १७ वर्षीय युवतीचा तिच्या कुटुंबीयांनी तिचे इच्छेविरुद्ध बाल विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तक्रारीनंतर उघड झाला. याप्रकरणी पोलिसांकडून बालविवाह कायद्यांतर्गत ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

*वरूड/तुषार अकर्ते*

शे.घाट पोलिस स्टेशन हद्दीत १७ वर्षीय युवतीचा तिच्या कुटुंबीयांनी तिचे इच्छेविरुद्ध
बाल विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तक्रारीनंतर उघड झाला. याप्रकरणी पोलिसांकडून बालविवाह कायद्यांतर्गत ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


प्राप्त माहितीनुसार, पिडिता अल्पवयीन असल्याचे माहीती असुन सुद्धा तिच्या कुटुंबातील काही लोकांनी तिला न सांगता रूपेश कवडेती या युवकासोबत तिचा विवाह जोडला. माझे वय १८ वर्ष पुर्ण झाले नसताना मला जबरदस्तीने रूपेशसोबत विवाह करायला लावत असल्याची माहिती तिने तिच्या वडिलांना फोनवरून दिली. परंतु, तिच्या वडीलांनी तिला सहकार्य न करता तु हा विवाह केला नाहीस तर मी विष प्राशन करून मरून जाईल अशी धमकी तिला दिली.

त्यामुळे तीने याधमकीला घाबरून या विवाहाला होकार दिला. या विवाहाला तिचे काका सुरेश कुमरे सुद्धा हजर होते. ती अल्पवयीन असल्याची माहीत असुन सुद्धा संबंधित आरोपीतांनी जबरदस्तीने तिचा विवाह २२ ते २४ जुन दरम्यान लावुन दिला. याप्रकरणी पिडीतेने ९ जुलै रोजी शे.घाट पोलिसांत तक्रार दिली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी एकूण ७ लोकांविरुद्ध बाल विवाह कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले.

यामध्ये देवराव कुमरे, नितेश नवडेक रा.वघार वंडली, रूपेश बलदेव कवडेती, योगिता पाटील, कमलेश पाटील रा.अंबाडा, सविता धुर्वे, पंचफुला कवडेती रा.रवाळा यांचा समावेश आहे. सदर घटनास्थळ मोर्शी पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने शे.घाट पोलिसांकडून ते वर्ग करण्यात आल्याने पुढील तपास मोर्शी पोलिस करत आहे.

SUPER BHARAT

SUPER BHARAT
लेखक / प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *