Saturday, 07 November 2026 ई-पेपरसंपर्क
विश्वसनीय बातमी • तत्काळ अपडेट
● BREAKING NEWS
दैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरीदैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरी

उत्सवाचा झगमगाट कमी, farmer बळीराजासाठी मदतीचा हात मोठा!

प्रकाशित: 10 October 2026 अपडेट: 10 October 2026 98 views
प्रिती पाण्डेय ठाणे : प्रतिनिधी / नवरात्रोत्सवातील रोषणाई, फटाके आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त farmer शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी निधी उभारण्याचा संकल्प नवयुग मित्र मंडळाने केला आहे. देवीची भक्ती करताना बळीराजासाठी मदतीचा हात देऊन नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श मंडळाने ठेवला आहे.
farmer

नवरात्रोत्सवात अनावश्यक खर्च टाळून नवयुग मित्र मंडळाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा संकल्प

प्रिती पाण्डेय
ठाणे : प्रतिनिधी / नवरात्रोत्सवातील रोषणाई, फटाके आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त farmer
शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी निधी उभारण्याचा संकल्प नवयुग मित्र मंडळाने केला आहे. देवीची भक्ती करताना बळीराजासाठी मदतीचा हात देऊन नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श मंडळाने ठेवला आहे. अशी माहिती आयोजकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला डॉ. सागर रमेश आंब्रे, भाजप मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आदीसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ (रजि.) आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा नवरात्रोत्सवाचे २२ वे वर्ष साजरे होत आहे. ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक ४ च्या नगरसेविका तथा मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहाताई रमेश आंब्रे, मंडळाचे संस्थापक व भाजपचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंब्रे आणि मंडळाचे सरचिटणीस व ट्रस्टचे संस्थापक डॉ. सागर रमेश आंब्रे यांच्या नियोजनातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. farmer

यंदा विद्युत रोषणाई मर्यादित ठेवण्यात येणार असून, नऊ दिवसांतील नियोजित मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच फटाके आणि डीजेचा वापरही टाळण्यात येणार आहे. या माध्यमातून वाचणारा निधी आणि मंडळ व ट्रस्टच्या माध्यमातून जमा होणारी आर्थिक मदत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी farmer कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवात सप्तशती पाठ, भजनांचे आयोजन, महाआरती, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी आरोग्य तपासणी व मॅमोग्राफी शिबिर, कन्यापूजन, होमहवन आणि महाप्रसाद असे विविध उपक्रम देखील आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या farmer मदतीसाठी आवाहन

भाविक, नागरिक, व्यापारी, उद्योजक, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी नवयुग मित्र मंडळाच्या या सेवाकार्यात आर्थिक योगदान देऊन सहभागी व्हावे, याकरिता उत्सवस्थळी बँक तपशील व क्यु आर कोड प्रदर्शित करण्यात आला आहे. farmer
आर्थिक मदतीसाठी बँक तपशील
बँकेचे नाव: फेडरल बँक, मानपाडा शाखा
खात्याचे नाव: Navyug Mitra Mandal
खाते क्रमांक: 16810100009939
IFSC कोड: FDRL0001681

SUPER BHARAT

SUPER BHARAT
लेखक / प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *