Friday, 06 November 2026 ई-पेपरसंपर्क
विश्वसनीय बातमी • तत्काळ अपडेट
● BREAKING NEWS
दैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरीदैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरी

मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सून monsoon ची माघार सुरू:हवामान विभागाची मोठी घोषणा, पुढील 2-3 दिवसांत संपूर्ण राज्यातून परतीचा प्रवास पूर्ण होणार

प्रकाशित: 03 October 2026 अपडेट: 03 October 2026 97 views
राज्यात यंदा पावसाचा हंगाम monsoon आता संपण्याच्या मार्गावर आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परतण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील पावसाळी हंगाम संपण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील…

मुंबई – monsoon राज्यात यंदा पावसाचा हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परतण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील पावसाळी हंगाम संपण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांतून मोसमी वारे माघारी फिरले आहेत. मुंबईसह इतर काही भागांतही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील पावसाळ्याचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दरम्यान, मान्सूनची माघार सुरू झाली असली तरी काही ठिकाणी परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामान विभागाकडून पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. पावसाळा संपत असल्याने शेती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि आगामी पिकांच्या नियोजनाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. monsoon

पुढील 48 तासांत 13 राज्यांतून मान्सून परतणार भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत देशातील 13 राज्यांच्या काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील उर्वरित भाग, गुजरात, मध्य प्रदेशातील बहुतांश भाग, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. एकीकडे उत्तर आणि मध्य भारतातून मान्सून माघारी फिरत असताना दक्षिण भारतातील काही भागांत मात्र पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील काही भागांत जोरदार पाऊस, तर केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदा देशात सरासरीपेक्षा 12.6 टक्के कमी पाऊस यंदाच्या मान्सून हंगामात देशभरात अपेक्षेपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या 87.4 टक्के पाऊस झाला. या कालावधीत साधारणपणे 868.6 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा प्रत्यक्षात 759.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे देशात यंदा सरासरीपेक्षा 12.6 टक्के कमी पाऊस झाला. 2001 नंतरचा हा देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा मान्सून हंगाम ठरला आहे. त्यामुळे मान्सूनची माघार सुरू होत असताना पावसाच्या कमतरतेचा परिणाम शेती आणि पाणीसाठ्यावर किती होतो, याकडे आता लक्ष लागले आहे. monsoon

बातमी – 2 बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली:

बुलढाणा – बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली:जमीन विकली, पत्नीची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटेना; चिठ्ठी लिहून आत्महत्या शेतीतील नुकसान, सततची नापिकी आणि डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथे शंकर रामभाऊ भारसाकळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत कर्ज फेडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. स्वतःची जमीन विकली, एक वावर गहाण ठेवले, पत्नीची पोतही गहाण ठेवली; मात्र तरीही कर्ज फिटले नसल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.

SUPER BHARAT

SUPER BHARAT
लेखक / प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *