Friday, 06 November 2026 ई-पेपरसंपर्क
विश्वसनीय बातमी • तत्काळ अपडेट
● BREAKING NEWS
दैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरीदैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरी

‘500 कोटींचा विषय संपला, आता audio-clip ऑडिओ क्लिपची चौकशी’:टार्गेट करणाऱ्यांचे षड्यंत्र समोर आणणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती

प्रकाशित: 23 October 2026 अपडेट: 23 October 2026 107 views
कथित audio-clip ऑडिओ क्लिपमधील ५०० कोटींच्या व्यवहाराचा आरोप एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी फेटाळल्यामुळे तो विषय संपला असला, तरी त्या क्लिपमधील वक्तव्यांची आता फॉरेन्सिक आणि सायबर चौकशी केली जाणार आहे.

मुंबई –  कथित audio-clip ऑडिओ क्लिपमधील ५०० कोटींच्या व्यवहाराचा आरोप एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी फेटाळल्यामुळे तो विषय संपला असला, तरी त्या क्लिपमधील वक्तव्यांची आता फॉरेन्सिक आणि सायबर चौकशी केली जाणार आहे. मंत्री उदय सामंत यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासणीचे आदेश दिले असून, यामागे कोणाला टार्गेट करण्याचे षड्यंत्र असल्यास ते या चौकशीतून जनतेसमोर आणले जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती सामंत यांनी दिली आहे.

उदय सामंत म्हणाले, मला असं एक महायुतीतला कार्यकर्ता म्हणून वाटतं की, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या बाबतीतली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे की जो काय ५०० कोटींचा व्यवहार झाला, अशा पद्धतीची क्लिप… त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असं घेण्याचा प्रश्न येत नाही. आणि परवा जरांगे यांनी सांगितलं, मी देखील घेतले नाहीत. त्याच्यामुळे ५०० कोटींचा विषय तिथे संपलेला आहे. ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी पुढे उदय सामंत म्हणाले की, मुद्दा राहतो त्या क्लिपमध्ये जी काही वक्तव्य आहेत त्याच्या संदर्भातला, आणि त्याच्या संदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील भूमिका स्पष्ट केली. audio-clip

आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील भूमिका स्पष्ट केली, जी काल इथूनच मी मागणी केली होती की फॉरेन्सिक ऑडिट त्याचं झालं पाहिजे, सायबर गुन्हा दाखल झाला पाहिजे, एसआयटी नेमली गेली पाहिजे. आणि त्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ हे काल ‘वर्षा’ बंगल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलं. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश उदय सामंत म्हणाले, आज बहुतेक नागपूरमधलं मुख्यमंत्री महोदयांचं मतदान झाल्यानंतर त्यांनी आमची जी मागणी होती ती मान्य केली की फॉरेन्सिक याची तपासणी झाली पाहिजे, सायबर तपासणी झाली पाहिजे आणि या क्लिपपर्यंत पोहोचलंच पाहिजे, ही भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडली. आणि जर कोणाला टार्गेट करण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल, ते देखील महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. याचा अर्थ जी शिवसेनेच्या माध्यमातून मागणी केली गेली ती सकारात्मक मुख्यमंत्र्यांनी घेतली. audio-clip

नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य आज रामदास भाईंनी त्यांच्या भावना मांडल्या असतील, प्रसाद लाड आपल्या भावना मांडत असतील… परंतु माझी रामदास भाईंना मी विनंती करू शकत नाही कारण ते शिवसेनेचे नेते आहेत, पण लाड हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये देखील काम करतात. जरांगेंच्या आंदोलनाच्या प्रोसेसमध्ये मी आणि ते एकत्र होतो. मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण महायुतीमध्ये एखादी क्लिप एखाद्याने दिल्यानंतर त्याची चौकशी झाली पाहिजे ही भूमिका शिवसेनेची होती, ती उपमुख्यमंत्र्यांनी मांडली. रामदास भाईंनी त्यांच्या भावना त्या ठिकाणी मांडल्या… audio-clip

प्रसाद लाड साहेबांनी देखील मांडल्या, आक्रमक पद्धतीने दरेकर साहेबांनी देखील मांडल्या. आता सगळ्यांच्या भावना सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि चौकशी अंती हे सगळं बाहेर येणार आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले. ‘रामदास भाईंच्या वयाचा रिस्पेक्ट करता सगळ्यांनीच रिस्पेक्ट ठेवून बोललं पाहिजे’ उदय सामंत म्हणाले, रामदास भाईंच्या वयाचा रिस्पेक्ट करता सगळ्यांनीच अगदी त्यांचा रिस्पेक्ट ठेवून बोललं पाहिजे, या मताचा मी आहे. परंतु या सगळ्या गोष्टीवर मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय घेतलेला असेल की याची आता फॉरेन्सिक चौकशी होणार आहे, आणि फॉरेन्सिक चौकशीनंतर त्या ऑडिओमधला आवाज कोणाचा आहे, त्या ठिकाणी कोण बसलेले होते अशा पद्धतीची चर्चा स्वतः त्यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर सगळ्या नेतेमंडळींना माझी विनंती आहे की, महायुतीचं सरकार हे शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय सक्षमपणाने चालवत आहेत. मतभेद निर्माण करण्याच्या कटावर टीका पुढे सामंत म्हणाले, हे सरकार चालवत असल्यामुळेच काही लोकांना बघवत नाहीये, म्हणूनच अशा प्रवृत्ती पुढे येत आहेत. audio-clip

आणि त्या प्रवृत्ती जर बाहेर काढायच्या असतील, त्यांना जर ओळखायचं असेल, तर आम्ही एकत्रपणाने या सगळ्या प्रसंगांना सामोरं गेलं पाहिजे. शिवसेनेची भूमिका आम्ही पत्रातून देखील मांडली, ती काय अशी लपून छपून मांडली नाही. पत्रातून देखील आमच्या खासदारांनी, आमदारांनी असं म्हटलं साहेबांच्या नेतृत्वाखाली, की याची चौकशी का झाली पाहिजे? तर हे कुठेतरी आपल्या दोन्ही संघटनांमध्ये, दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोण करत असतील, किंवा अशा पद्धतीची यंत्रणा कोण राबवत असेल, किंवा एकनाथ शिंदे साहेबांना श्रीकांत शिंदे साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल, आणि या दोघांना बदनाम केल्यानंतर शिवसेना बदनाम होते आणि असे आरोप झाल्यानंतर रोज सकाळच्या पत्रकार परिषदेला विषय मिळतो, असं कोण षडयंत्र करतंय का? यावर सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा विचार विनिमय केला पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी केली आहे. audio-clip

SUPER BHARAT

SUPER BHARAT
लेखक / प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *