चौघांविरुद्ध गुन्हे दाखल, ४०.८० रूपायांचा मुद्देमाल जप्त !
वरूड/तुषार अकर्ते
वरूड – मध्यप्रदेशातुन महाराष्ट्रात छुप्या मार्गाने अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर शेंदुरजनाघाट पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. शे.घाट ठाण्याच्या हद्ददीतील कारली मार्गावर दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेत एकुण ४० लक्ष ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवार १२ जुलै रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कारली मार्गावर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. यावेळी हायवा क्रमांक एम एच २७ टी डी ०९०७ व हायवा क्रमांक एम एच २७ डि टी ०९२२ वाहनांना थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहणातील रेतीबाबत पोलिसांना अनियमितता आढळून आल्याने दोन्ही वाहनांना ताब्यात घेत चार आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक २३२/२०२६ कलम ३०३ (२) ४९ बी एन एस आर डब्ल्यु ९,१५, पर्यावरण संरक्षण अधिनियम आर डबल्यू ४८ (७) (८) जमीन महसूल अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.
अनिकेत नरेंद्र ढोंगे रा.ईत्तमगाव, विजय महेश कासे रा.पुसला, भागवत युवनाते रा.शहापूर, अक्षय दिवाकर धुर्वे रा.कारली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात एकूण ४० लक्ष ८० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही ठाणेदार राहुल गवळी, वीरेंद्र अमृतकर, रुपेश श्रीवास चालक निलेश वासनकर यांनी केली आहे.




