Friday, 06 November 2026 ई-पेपरसंपर्क
विश्वसनीय बातमी • तत्काळ अपडेट
● BREAKING NEWS
दैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरीदैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरी

धरणात water पाणी, शेतात दुष्काळ! संजय राठोड यांच्या जवळच्या नातेवाईकांचीच पिके करपली , ईतरांचे हाल काय असेल

प्रकाशित: 18 October 2026 अपडेट: 18 October 2026 107 views
पांढरकवडा - water एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या घोषणा करीत आहेत. दुसरीकडे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड जलसमृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न दाखवत आहेत. हजारो कोटी रुपयांच्या जलसंधारण कामांची आकडेवारी प्रसिद्ध होत आहे.
  • सायखेडा water धरणात २५ वर्षांचा गाळ, कालव्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधींचा कथित खर्च!
  • आता शेतकरी सावकारांकडून कर्ज काढून स्वतः कालवे दुरुस्त करीत आहेत!
  • उमरी–किन्हाळा तांडा येथील शेतकऱ्यांची हृदयद्रावक व्यथा
  • सरकार आणखी किती शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वाट पाहणार? – किशोर तिवारी

आशिष बडवे

पांढरकवडा – water एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या घोषणा करीत आहेत. दुसरीकडे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड जलसमृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न दाखवत आहेत. हजारो कोटी रुपयांच्या जलसंधारण कामांची आकडेवारी प्रसिद्ध होत आहे. मात्र संजय राठोड यांच्या निकटवर्तीय नातेवाईकांचे वास्तव्य असलेल्या उमरी–किन्हाळा तांडा येथील शेतकऱ्यांची परिस्थिती या घोषणांमधील आणि प्रत्यक्ष वास्तवातील अंतर उघड करते! येथील शेतकरी रमेश गर्दूजी चव्हाण आणि प्रशांत बालाजी बोंडे यांनी आपल्या व्यथा चित्रफितीत शेतकरी नेते किशोर तिवारी यांचेकडे मांडल्या आहेत.

रमेश चव्हाण सांगतात की त्यांच्याकडे ३३ एकर शेती असूनही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशांत बोंडे यांच्या मुलीचे वैद्यकीय शिक्षण अंतिम वर्षात आहे. मात्र दुष्काळामुळे ते मुलीच्या शिक्षणाचे अवघे सहा हजार रुपये पंधरा दिवस भरू शकले नाहीत. मुलगी वारंवार फोन करून रडत असल्याची त्यांची व्यथा ऐकून मन सुन्न होते.ज्या शेतकरी बापाने मुलीला डॉक्टर करण्यासाठी आयुष्याची कमाई खर्च केली, त्याला आज सहा हजार रुपयांसाठी हतबल व्हावे लागत आहे! water

सायखेडा धरणात पाणी असताना शेतकऱ्यांची पिके का वाळत आहेत?

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सायखेडा धरणात मागील २५ वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. कालव्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखवले जात असल्याचा गंभीर आरोपही पुढे येत आहे.या खर्चाचा हिशेब कुठे आहे? कामे नेमकी कुठे झाली? कालवे आजही बंद किंवा अडथळ्यांनी भरलेले का आहेत? water
सर्वांत संतापजनक बाब म्हणजे, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आता सावकारांकडून कर्ज काढून स्वतः कालव्यांची दुरुस्ती करावी लागत आहे!शासनाच्या यंत्रणेने करायचे काम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी कर्ज काढून करायचे, आणि शासनाने जलसमृद्धीच्या घोषणा करायच्या?
दुष्काळात तेरावा महिना आणण्याचा हा प्रकार नाही तर काय? असा सवाल तिवारी यांनी केला आहे

संजय राठोड यांना थेट प्रश्न! water

उमरी–किन्हाळा तांडा येथील हे शेतकरी आपले जवळचे नातेवाईक असल्याचे सांगतात. आपल्या निकटच्या नातेवाईकांचीही पाण्यासाठी अशी अवस्था होत असेल, तर सामान्य शेतकऱ्यांची दाद कोण घेणार?याच हंगामात आपल्या कुटुंबाशी नाते असलेल्या एका जावयाने उमरी–किन्हाळा तांड्यावर आत्महत्या केल्याची गंभीर माहिती समोर येत आहे. संजय राठोड यांच्या संवेदनशील पत्नी यांनी भेट घेतली होती मात्र आपणास आजही भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही आपले आश्रम शाळेत चपराशी असलेले मात्र एकदी दिवस मागील १५ वर्षांत कामावर हजर झाले नाहीत व आपण त्यांना शिंदे सेनेचा संघटक नियुक्त केले आहे त्यांनी सुद्धा ही मुद्दा उपस्थित केला नाही व दररोज फोटो जाहिराती करत विदेशी गाड्यात व ५० तोळे सोन्याचे दागिने घालून फिरतात ते सुद्धा भटकत नाहीत हे दुर्भाग्य आहे. असे तिवारी यांनी म्हटले आहे

मंत्रीमहोदय, आपल्या जवळच्या नातेवाईकांची पाण्यासाठीची हाकही प्रशासनापर्यंत पोहोचत नसेल, तर आणखी किती शेतकरी कुटुंबे संकटात सापडल्यानंतर शासन जागे होणार?आत्महत्यांच्या घटना या केवळ आकडेवारी नसतात. प्रत्येक घटनेमागे उद्ध्वस्त कुटुंब, कर्जाचे ओझे, मुलांचे शिक्षण आणि जगण्याचा संघर्ष असतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे! water

१. सायखेडा धरणातील गाळ काढण्यासाठी मागील २५ वर्षांत किती निधी मंजूर झाला आणि किती गाळ प्रत्यक्ष काढण्यात आला?
२. कालव्यांच्या दुरुस्तीवर वर्षनिहाय किती कोटी रुपये खर्च झाले? त्या कामांचे मोजमाप आणि गुणवत्ता तपासणी अहवाल कुठे आहेत?
३. शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेऊन कालव्यांची दुरुस्ती का करावी लागत आहे?
water

४. धरणात पाणी उपलब्ध असल्याचे शेतकरी सांगत असताना ते उमरी–किन्हाळा तांडा येथील पिकांपर्यंत का पोहोचत नाही?
५. परिसरातील शेतकरी आत्महत्येची घटना आणि तिच्यामागील आर्थिक व सामाजिक परिस्थितीची निष्पक्ष चौकशी कधी होणार?

विदर्भ जनआंदोलन समितीच्या मागण्या

सायखेडा water धरण आणि संबंधित कालव्यांची तातडीने संयुक्त पाहणी करावी. पाणी उपलब्धता व तांत्रिक व्यवहार्यता तपासून शेतकऱ्यांच्या पिकांसाठी तातडीने पाणी सोडावे. मागील २५ वर्षांतील गाळ काढणे आणि कालवा दुरुस्तीच्या खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करावे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केलेल्या आवश्यक दुरुस्तीचा पंचनामा करून खर्चाची भरपाई द्यावी.दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीनुसार मदत द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष सहाय्य आणि संकटग्रस्त कुटुंबांना आर्थिक व मानसिक आधार उपलब्ध करावा.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही किशोर तिवारी यांनी सवाल केला आहे — ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना म्हणतात तुम्ही झोपले आहात काय? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख ऐकण्याची जबाबदारी तुमचीही नाही काय? सरकारला प्रसिद्धी हवी असेल; पण शेतकऱ्यांना प्रसिद्धी नको, पाणी हवे आहे. घोषणा नकोत, जगण्याची हमी हवी आहे. सायखेडा धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले पाहिजे. कालव्यांच्या खर्चाचा हिशेब जनतेसमोर आला पाहिजे. अशा मागण्या विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्या आहे water

SUPER BHARAT

SUPER BHARAT
लेखक / प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *